दिल्ली l Delhi

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांनी याबाबत माहिती दिली आहे. जिल्हास्तरीय सुरक्षा समिती आणि जिल्हास्तरीय चलन व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

RBI चे सहाय्यक महाव्यवस्थापक बी महेश यांनी म्हंटले आहे की. ५, १० आणि १०० रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा चलनातून बाद होण्याची शक्यता आहे. मार्च किंवा एप्रिलपर्यंत आरबीआय ५, १० आणि १०० रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा चलनातून बाद करण्याचा विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

ते पुढे म्हणाले की, १० रुपयांची नाणी चलनात येऊन १५ वर्षे झाले तरी अजूनही व्यापारी आणि व्यावसायिक ती नाणी स्वीकारण्यास तयार नाहीत. आता हीच नाणी बँका आणि आरबीआयसाठी समस्या बनल्या आहेत. बँकांकडे मोठ्या प्रमाणावर दहा रुपयांची नाणी जमा झाली आहे. त्यामुळे बँकांनी नाण्याच्या वैधतेबद्दल पसरल्या गेलेल्या अफवांविषयी लोकांना जागरूक केले पाहिजे. ही १० रुपयांची नाणी पुन्हा चलनात येतील यासाठी बँकांनी काही मार्ग शोधले पाहिजेत. २०१९ मध्ये आरबीआयने १०० रुपयांची नवी जांभळ्या रंगातील नोट आणली होती. बी महेश यांनी १०० च्या नव्या नोटा चलनातून बाद होणार नाहीत असं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, ८ नोव्हेंबर, २०१६ रोजी नोटबंदीनंतर केंद्रीय बँकेने २००० रुपयांच्या नोटासह २०० रुपयांची नोटही चलनात आणली. २०१९ मध्ये आरटीआयच्या प्रश्नाला उत्तर देताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले होते की, सेंट्रल बँकेने उच्च मूल्याच्या नोटांच्या छपाईला आळा घातला आहे. दुसरीकडे छोट्या नोटा (१० आणि २०) च्या वाढत्या संख्येमुळे बँक कर्मचारी आणि अधिकारी त्रस्त झाले आहेत. आरबीआय आणि ग्राहक या नोटा घेत नसल्यामुळे त्यांना बँकांमध्ये ठेवण्यासाठी जागा कमी पडत आहे. परिस्थिती अशी आहे की या नोटा शेल्फमध्ये ठेवाव्या लागत आहेत. अशा जवळ जवळ १०० कोटीहून अधिक लहान नोट डंप पडल्या आहेत. अशीच परिस्थिती नाण्यांचीही आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे.