दिल्ली l Delhi

RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी शुक्रवारी (०५ फेब्रुवारी) पतधोरण जारी केले या पतधोरणात. रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी माहिती दिली आहे.

RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, आर्थिक वर्ष २०२१-२२ या आर्थिक धोरणात उदारमतवादी भूमिका कायम ठेवली गेली आहे. पुढील आर्थिक वर्षात जीडीपी विकास दर १०.५ टक्के राहील असा अंदाज आहे. महागाई ४ टक्के समाधानकारक श्रेणीत आली आहे. पुनरुज्जीवन चिन्हे मजबूत झाल्याने आर्थिक विकासाचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. भाजीपाल्याच्या किंमती नजीकच्या काळात नरम राहतील अशी अपेक्षा आहे, २०२०-२१ च्या चौथ्या तिमाहीत महागाई सुधारण्यात आली असून महागाईचा दर ५.२ टक्के असेल असा अंदाज आहे.

तसेच पुढे बोलतांनादास म्हणाले की, मार्च २०२१ पर्यंत सरकार RBI च्या महागाई लक्ष्याचा आढावा घेईल, चलनवाढ लक्ष्य प्रणालीने चांगले काम केले आहे. चलनविषयक धोरणाच्या अनुषंगाने रोख व्यवस्थापनाबाबतचा कल मध्यम राहिला आहे. बाजारपेठेतून सरकारची उधारी वसूल करण्याचा कार्यक्रम कोणत्याही व्यत्ययाशिवाय पुढे कायम राहिली याची खात्री रिझर्व्ह बँक करेल. रिझर्व्ह बँकेने २७ मार्च २०२१ पर्यंत बँकांचे रोख राखीव प्रमाण (CRR) हळूहळू ३.५ टक्क्यांपर्यंत आणण्याचा निर्णय घेतला. २७ मे २०२१ पर्यंत रोख राखीव प्रमाण हळूहळू ४ टक्क्यांवर आणले जाईल. हे लक्षात घ्यावे लागेल की मागील तीन आर्थिक आढावा बैठकींमध्ये एमपीसीने व्याज दरात बदल केलेला नाही. रेपो दर सध्या ४ टक्क्यांच्या विक्रमी पातळीवर आहे. रिव्हर्स रेपो दर ३.३५ टक्के आहे. रिझर्व्ह बँकेने अखेर २२ मे २०२० रोजी पॉलिसी दरात सुधारणा केली होती. त्या वेळी मागणी वाढविण्यासाठी केंद्रीय बँक चलनविषयक धोरण समितीच्या आढावा बैठकीची वाट न पाहता दर कमी करते. गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून केंद्रीय बँकेने रेपो दरात १.१५ टक्क्यांनी कपात केली आहे.

रेपो रेट म्हणजे काय?

दररोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. हे अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देतात. रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले की बँकाही आपल्या कर्जांचे दर वाढतात.