RBI कडून रेपो व्याज दरात वाढ; तुमच्या खिशावर होणार मोठा परिणाम

RBI Governor Shaktikanta Das
RBI Governor Shaktikanta Das

दिल्ली | Delhi

ऑक्टोबरनंतर पुन्हा एकदा RBI ने आपल्या रेपो व्याज दरात वाढ केली आहे. तीन महिन्यांनी पुन्हा व्याज दरामध्ये वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांवर कर्ज आणि EMI चा बोजा वाढणार आहे.

RBI ने रेपो व्याज दरात 0.35% वाढ केली आहे. यामुळे रेपो व्याज दरा 5.90% वरून 6.25% झाला आहे. म्हणजेच होम लोनपासून ते ऑटो आणि पर्सनल लोनपर्यंत सर्व काही महाग होईल आणि तुम्हाला जास्त ईएमआय भरावा लागेल.

रिझर्व्ह बँकेची पतधोरणविषयक बैठक सोमवारपासून सुरू होती. त्यानंतर आज आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत देसाई यांनी पत्रकार परिषदेत पतधोरण जाहीर केले. त्यांनी म्हटले की, आपण आणखी एका आव्हानात्मक वर्षाच्या अखेरीस आले आहोत. देशातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये महागाईचा दर वाढला असल्याचे शक्तिकांत दास यांनी म्हटले.

रेपो रेट म्हणजे नेमकं काय?

रेपो रेटच्या आधारावर आरबीआय बँकांना कर्ज देत असते. त्यानंतर बँका हे कर्ज ग्राहकांना देत असतात. रेपो रेट कमी असल्याचा अर्थ असा आहे की बँकांकडून लोकांना मिळणारे कर्ज स्वस्तात मिळू शकते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com