PMC बँक होणार USFB मध्ये होणार विलीन; ठेवीदारांना मिळणार पूर्ण पैसे

PMC बँक होणार USFB मध्ये होणार विलीन; ठेवीदारांना मिळणार पूर्ण पैसे

दिल्ली | Delhi

आर्थिक संकटात सापडलेल्या पीएमसी (PMC Bank) अर्थात पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को ऑपरेटिव बॅंकेतील (Punjab and Maharashtra Co-operative bank) ठेवीदारांचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पीएमसी बँकेचं यूनिटी स्मॉल फायनान्स बँकेत ( Unity Small Finance Bank) विलिनीकरण केलं जाणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ड्राफ्ट स्कीम जाहीर केली.

PMC बँकेतील ठेवी, कर्ज, थकीत कर्ज तसेच PMC बँकेचे उत्पन्न, मालमत्ता, सर्व शाखा यांचे युनिटी स्मॉल फायनान्स बँकेकडे पूर्ण हस्तांतरण केले जाईल. ज्यांनी PMC बँकेकडून कर्ज घेतले आहे त्यांना हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होताच युनिटी स्मॉल फायनान्स बँकेकडे पुढील हप्ते भरावे लागतील. या व्यवस्थेमुळे पीएमसी बँकेतील सर्व ठेवीदारांच्या सगळ्या ठेवींना संरक्षण मिळेल.

ज्या ग्राहकांचे पैसे PMC बँकेत अडकले आहेत, त्यांना पुढील तीन ते १० वर्षात पूर्ण पैसे परत मिळतील. RBI च्या मसुद्याच्या योजनेनुसार, USF बँक ठेवीदारांना ५ लाख रुपयांची हमी रक्कम देईल. त्यानंतर, बँक दोन वर्षांनी ५०००० रुपये, तीन वर्षांनी १ लाख रुपये, चार वर्षांनी ३ लाख रुपये, ५ वर्षांनी ५.५ लाख रुपये आणि १० वर्षांनी संपूर्ण रक्कम देईल.

युनिटी स्मॉल फायनान्स बँकेची स्थापना ११०० कोटी रुपयांची गुंतवणूक करुन झाली आहे. साधारणपणे अशा स्वरुपाच्या बँकेच्या स्थापनेसाठी किमान २०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाते. पण युनिटी स्मॉल फायनान्स बँकेची आर्थिक स्थिती अतिशय उत्तम आहे. यामुळे विलीनीकरणानंतर PMC बँकेच्या ठेवीदारांच्या ठेवींना USFB मध्ये सुरक्षित संरक्षण मिळणार आहे.

युनिटी स्मॉल फायनान्स बँक ही सेंट्रम ग्रुप (Centrum Group) आणि भारतपे (Bharatpe) यांचा संयुक्त उपक्रम आहे. या बँकेची सुरुवात युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (Unity Small Finance Bank Limited) या संस्थेने लघु वित्त पुरवठादार बँकेच्या स्वरुपात १ नोव्हेंबर २०२१ पासून केली.

दरम्यान, सप्टेंबर २०१९ रोजी घोटाळा आणि कर्ज वितरणात अनियमिततेचा सुगावा लागताच, रिझव्‍‌र्ह बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध आणले आहेत. तत्कालीन संचालक मंडळातील बहुतांश सदस्य गजाआड असून, बँकेचा कारभाग रिझव्‍‌र्ह बँकेकडून नियुक्त प्रशासकाच्या हाती आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com