दिल्ली | Delhi

RBI ने खाजगी क्षेत्रातील अग्रगण्य बँक एचडीएफसी HDFC बँकेला दहा लाखांचा दंड ठोठावला आहे. HDFC ने एक्सचेंज फायलिंगमध्ये (Stock Exchange Filing) याबाबत माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, HDFC ने सब्सिडिअरी जनरल लेजर (Subsidiary General Ledger)मध्ये आवश्यक रक्कम ठेवली नाही, परिणामी एसजीएल (SGL) बाउन्स झाला. त्यांनतरहा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयकडून एचडीएफसी बँकेला ९ डिसेंबरला हा आदेश देण्यात आला.

RBI ने दिलेल्या माहितीनुसार, ९ डिसेंबर रोजी एचडीएफसी बँकेला आदेश देण्यात आले होते. याची माहिती १० डिसेंबर रोजी उघडकीस देखील करण्यात आली होती. आरबीआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एचजीएफसीने (SGL) एसजीएलमधील वाढीसाठी दहा लाख रुपये दंड आकारला आहे. इतकंच नाही तर या आदेशानंतर 19 नोव्हेंबर रोजी बँकेच्या सीएसजीएल खात्यातील सिक्युरिटीजची शिल्लक काही प्रमाणात कमी करण्यात आला आहे. यामुळे शुक्रवारी एचडीएफसी बँकेचे शेअर्स १,३९०.०५ रुपयांवर उघडले.

हे एक प्रकारचे डिमॅट खाते असते. ज्यात सरकारी बाँड्स बँकांद्वारे ठेवले जातात. तर सीएसजीएल बँकेमार्फत उघडला जातो ज्यामध्ये बँका ग्राहकांच्या वतीने बाँड ठेवतात. जेव्हा बाँडसंबंधित काही व्यवहार अयशस्वी झाल्यास त्याला एसजीएल बाउन्स झाल्याचे म्हणतात.
.HDFC क्रेडिट कार्डबाबत RBI चा मोठा निर्णय .
दरम्यान, गेल्या काही काळापासून डिजिटल कामकाजामध्ये येणाऱ्या समस्येमुळे आयबीआयने एचडीएफसी बँकेला फटकारलं होतं. ०३ डिसेंबर रोजी आरबीआयने एचडीएफसी बँकेच्या प्रस्तावित डिजिटल सेवांवर बंदी आणली आहे. खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या एचडीएफसी बँकेच्या डिजिटल सेवा थांबवण्याचे आदेश केंद्रीय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिले होते. बँकेच्या डिजिटल २.० या उपक्रमाअंतर्गत असणाऱ्या सुविधा आणि ग्राहकांसाठी नवीन कार्ड्स लाँच करण्याच्या सेवा थांबवण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये नवीन क्रेडिट कार्ड लाँच करण्यावरही बंदी आणली आहे.