येथेही अयोध्येसारखे राम मंदिर बांधले जाणार !
देश-विदेश

येथेही अयोध्येसारखे राम मंदिर बांधले जाणार !

या मंदिराची प्रतिकृती अयोध्येच्या मंदिरा सारखीच असणार आहे

Nilesh Jadhav

मध्य प्रदेश | Madhya Pradesh

अयोध्या येथे आज झालेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या धर्तीवर मध्यप्रदेशमधील पुनर्वसित लेपा या गावात देखील राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. मध्यप्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

जवळपास दहा वर्षापूर्वी मध्यप्रदेशातील खरगोनमध्ये नर्मदा नदीच्या काठावर महेश्वर जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित होता, यामुळे लेपा गावातील जवळपास २५० कुटुंबांना साडेचार किलोमीटर दूरवर स्थलांतरित करण्यात आले होते. त्यानंतर काही कारणास्तव हा प्रकल्प रद्द करण्यात आला. परंतु गावातील श्रीराम मंदिर नर्मदाच्या पाण्याने पाण्याखाली गेले. पुनर्वसन झालेल्या ठिकाणी आता राम मंदिर बांधण्याचे नियोजन आहे. या मंदिराची प्रतिकृती अयोध्येच्या मंदिरा सारखीच असणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com