नवी दिल्ली -

नवे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी गेल्या अडीच महिन्यांपासून दिल्लीत शेतकर्यांचे आंदोलन सुरु आहे. सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये

चर्चेच्या अनेक फेर्या होवूनही अद्याप तोडगा निघालेला नाही.

या दरम्यान, कुरुक्षेत्रच्या पिहोवामध्ये बोलताना शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आता आंदोलन देशव्यापी होईल आणि चार लाख नाही तर 40 लाख ट्रॅक्टरची रॅली निघेल, असे म्हणत केंद्र सरकारला इशारा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आंदोलनजीवी जमात या शब्दावर निशाणा साधताना राकेश टिकैत म्हणाले, त्यांनी कधीही कोणतेही आंदोलन केले नाही, उलटे देश तोडण्याचे काम केले. त्यामुळे त्यांना आंदोलनजीवींबाबत माहिती नसेल. शहीद भगतसिंह, लालकृष्ण आडवाणी यांनीही आंदोलन केले होते, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही आंदोलनात भाग घेतला नाही. त्यामुळे त्यांना याबाबत माहिती असण्याचा प्रश्नच नाही, असेही ते म्हणाले.

दरम्यान, याआधी दिल्लीमध्ये प्रजासत्ताकदिनी निघालेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये हिंसाचार झाला होता आणि एका शेतकर्याचा मृत्यू झाला होता. तसेच आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आले होते, या दरम्यान 200 ते 300 पोलीस जखमी झाले होते, तर आंदोलकांनाही दुखापती झाल्या होत्या. तसेच लाल किल्ल्यावर आंदोलकांनी ध्वज फडकवल्याने मोठा गदारोळ झाला होता.