दिल्ली l Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज २०२१ या नववर्षात पहिल्यांदाच 'मन की बात केली'. या कार्यक्रमात त्यांनी शेतकरी आंदोलनादरम्या प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान लाल किल्ल्यावर तिरंग्याचा अपमान झाल्याबाबत दु:ख व्यक्त केले. ही घटना पाहून देश व्यथित झाल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. त्यावरून शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पलटवार केला आहे.

'तिरंगा केवळ पंतप्रधानांचा आहे का? असा सवाल करत त्यांनी, संपूर्ण देशाचं आपल्या तिरंग्यावर प्रेम आहे. ज्याने तिरंग्याचा अपमान केला त्याला पकडलं जावं अशी मागणी केली आहे. ज्याने कोणी तिरंग्याचा अपमान केला आहे, त्याला पोलिसांनी ताब्यात घ्या, अशी प्रतिक्रिया टिकैत यांनी दिली आहे.

तसेच कृषी कायद्यांवरून शेतकरी व सरकारमध्ये पुन्हा चर्चा करण्याबद्दलही टिकैत यांनी भूमिका मांडली. 'कोणतीही चर्चा दडपणाखाली होणार नाही. आम्ही या विषयावर चर्चा करू. ते आमचेही पंतप्रधान आहेत. त्यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आम्ही आभारी आहोत. त्यांनी आमच्या लोकांना सोडावं, अशी आमची इच्छा आहे. आम्ही त्यांचा आदर करू,' असं टिकैत म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते पंतप्रधान?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून देशवासियांशी संवाद साधला. शेतकरी आंदोलनादरम्यान लाल किल्लावर झालेल्या घटनेबाबात त्यांनी प्रतिक्रिया दिली. दिल्लीत शेतकरी आंदोलना दरम्यान प्रजासत्ताक दिनी आयोजित ट्रॅक्टर रॅली दरम्यान उफाळलेल्या हिंसाचारामुळे व लाल किल्ल्यावर घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी भाष्य केले. ‘दिल्लीत २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिनी) रोजी तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून देश खूप दुःखी झाला. असे पंतप्रधान मोदी यांनी बोलून दाखवले.