राज्यसभा खासदार अमर सिंह यांचे निधन
देश-विदेश

राज्यसभा खासदार अमर सिंह यांचे निधन

सिंगापूर येथे उपचार सुरू असताना निधन

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

समाजवादी पार्टीचे पूर्वीचे नेता आणि राज्यसभा खासदार अमर सिंह यांचे आज निधन झाले आहे. सिंगापुर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते आजारी होते. उत्तर प्रदेश मधील मात्तबर नेते म्हणून त्यांची ओळख होती.

अमर सिंह यांचे समाजवादी पार्टीचे प्रमुख राहिलेले मुलायम सिंह यादव यांच्याशी घनिष्ट संबंध होते. तसेच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांशी आणि देशातील अनेक उद्योगपतींशी त्यांचे चांगले संबंध होते. ५ जुलै २०१६ ला त्यांना संसदेत घेण्यात आले होते. याच वर्षी फेब्रवारीमध्ये अमिताभ बच्चन यांची त्यांनी माफी देखील मागितली होती.

Deshdoot
www.deshdoot.com