नवी दिल्ली -

पाकिस्तान आणि चीनने कोणतीही आगळीक केल्यास त्यांना चोख प्रत्यूत्तर देण्यास भारत सज्ज आहे असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

यांनी दिला आहे. आम्हाला शांतता हवीय, वाद नको. भारत कुठल्याही स्थितीचा सामना करण्यास सज्ज आहे, मोदी सरकार देशाच्या सन्मानाशी तडजोड करणार नाही असेही ते म्हणाले. त्याचबरोबर सीमापार दहशतवाद आणि भारताविरूद्धच्या छुप्या युद्धाला चालना देण्यार्या पाकिस्तानवरही राजनाथ यांनी टीका केली.

हैदराबादमधील दुंडिगल येथील एअरफोर्स अॅकेडमीतील पदवीदान समारंभात ते बोलत होते. पश्चिमेकडून आपला शेजारी देश पाकिस्तान सीमेवर दुष्टकृत्य करत आहे. भारतासोबत चार युद्ध हारल्यानंतरही दहशतवादा आडून पाकिस्तान भारतासोबत छुपं युद्ध छेडतच आहे. मात्र, हे हल्ले परतवून लावणार्या सुरक्षा रक्षकांचा मी सत्कार करु इच्छितो, असं राजनाथ यावेळी म्हणाले.

आपल्या देशाचे तुम्ही रक्षणकर्ते आहात हे आमचं नशिब आहे. आपण आपल्या कर्तव्याला न्याय द्यालं, असा आम्हाला विश्वास आहे. बदलत्या काळासोबत देशाला असलेले धोके आणि युद्ध रनणीतीमध्येही आता बदल होत आहे, असं निरिक्षणंही यावेळी त्यांनी नोंदवलं.

भारत कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असून एलओसीवर पाकिस्तान तर एलएसीवर चीन या दोन्ही देशांशी भारताचा संघर्ष सुरु आहे. त्यामुळे भारताच्या उत्तर आणि पश्चिम सीमेवरील आव्हानं देखील आपल्या स्त्रोतांसाठी आव्हान आहे. भाजपाचे सरकार सीमेवर स्त्रोतांची कुठलीही कमी पडू देणार नाही, याचा मी तुम्हाला खात्री देतो, असंही राजनाथ यावेळी म्हणाले.