VIDEO : बिपीन रावत यांच्यासह १३ जणांना संसदेत आदरांजली

VIDEO : बिपीन रावत यांच्यासह १३ जणांना संसदेत आदरांजली

दिल्ली l Delhi

बुधवारी तामिळनाडूमध्ये अतिशय भीषण अशा दुर्घटनेमध्ये भारतानं देशाचे पहिले सीडीएस, जनरल बिपीन रावत यांना गमावलं. अतिशय गंभीर स्वरुपाच्या या हेलिकॉप्टर अपघातामध्ये एकूण १३ जणांचा मृत्यू झाला.

यामध्ये जनकरल रावत यांच्या पत्नी, मधुलिका रावत यांचाही समावेश होता. देशभरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पाहता पाहता सारा देश हळहळला. दरम्यान आज संसदेच्या दोन्ही सभागृहात बिपीन रावत यांच्यासह १३ जणांना आदरांजली वाहण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या दुर्घटनेबाबत लोकसभेत निवेदन दिले. यावेळी त्यांनी या अपघाताची चौकशी करण्यात येणार असल्याचे म्हटले.

राजनाथ सिंह यावेळी म्हणाले की, हेलिकॉप्टरमधील १४ पैकी १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह अधिकारी-जवानांचा समावेश होता. एअर चीफ मार्शल चौधरी यांना घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे. या घटनेची चौकशी एअरफोर्स एअर मार्शल मानवेंद्रसिंह यांच्या नेतृत्त्वात चौकशीचे आदेश दिले आहेत. मिलिट्री ऑनरसह अंत्यसंस्कार केले जातील. मी देशाच्या वतीने सर्वांना श्रद्धांजली अर्पित करतो, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com