नलिनी
नलिनी
देश-विदेश

राजीव गांधी हत्या; आराेपीचा आत्महत्येचा प्रयत्न

नलिनीला हवी हाेती दुसरी कठाेडी

jitendra zavar

jitendra zavar

नवी दिल्ली। New Delhi

माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या हत्या प्रकरणात दाेषी असलेल्या नलिनीने (Nalini) आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नलिनीला दुसरी काेठडी हवी हाेती. यासंदर्भात साेमवारी कारागृह अधीक्षकाशी तिचा वादही झाला हाेता. तिला दुसरी काेठडी न मिळल्यामुळे नलिनीने स्वत:चा गळा दाबून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ती २८ वर्षांपासून वेल्लाेर कारागृहात असून तिला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तिच्यासाेबत राजीव गांधी हत्येतील सहा दाेषी याच कारागृहात आहे. त्यात नलिनीचे पती मुरुगन ही आहे.

नलिनीच तिच्यासोबत जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्यासोबत भांडण झाले होते. त्यानंतर तिने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे तिच्या वकिलाने सांगितले. यावेळी त्यांनी यामागील खरे कारण समोर आले पाहिजे अशी मागणीही केली.

Deshdoot
www.deshdoot.com