अटक टाळण्यासाठी राज कुंद्राने दिली 25 लाखांची लाच

एका आरोपीचा दावा
अटक टाळण्यासाठी राज कुंद्राने दिली 25 लाखांची लाच

मुंबई / Mumbai - बॉलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योजक राज कुंद्राला अश्‍लील फिल्म्स तयार करणे आणि त्या अ‍ॅपच्या सहाय्याने रिलीज करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दरम्यान, राज कुंद्राने अटक टाळण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला 25 लाख रुपयांची लाच दिली, असा दावा या प्रकरणातल्या एका आरोपीने केला आहे.

या दाव्यामुळे गुन्हे शाखेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील आरोपी अरविंद श्रीवास्तव ऊर्फ यश ठाकूरने ई-मेलद्वारे मार्च महिन्यात एसीबीला याबाबतची तक्रार केली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यात एसीबीने ही तक्रार मुंबई पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात पाठवली होती. मुंबईतील पोलिस अधिकार्‍यांनी या आरोपावर मौन बाळगले आहे. गुन्हे शाखेने बुधवारी राज कुंद्राच्या अंधेरीतील कार्यालयावर छापा टाकला होता.

अरविंद श्रीवास्तव याची फ्लिज मूव्हीज नावाची कंपनी होती. याआधी या कंपनीचे नाव न्यूफ्लिक्स असे होते. ही अमेरिकेतील एक कंपनी आहे. या कंपनीद्वारे मार्च महिन्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी मार्चमध्ये या कंपनीचे मालक अरविंद श्रीवास्तव याचे 4.5 कोटी रुपये असलेली दोन बँक खाती गोठवली होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com