राज कुंद्रा आणि रायन जाँर्नला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

राज कुंद्रा आणि रायन जाँर्नला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

दिल्ली | Delhi

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पॉर्न फिल्म बनवण्याच्या आरोपात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला सोमवारी रात्री उशिरा अटक केली आहे.

आज राज कुंद्रा आणि इतर एक आरोपी रियान थार्प या दोघांना न्यायालयात हजर केलं असता त्या दोघांची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यापैकी राज कुंद्राला सोमवारी रात्री तर थार्पला आज सकाळी अटक करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली आहे.

फेब्रुवारी २१२१ मध्ये राजच्या नावानं तक्रार दाखल करण्यात आली होती. काल रात्री राजला मुंबई क्राईंम ब्रँच पोलिसांनी अटक केली. पोर्नोग्राफी व्हिडिओ तयार करण्याच्या प्रकरणात त्याचा महत्वाचा वाटा असल्याची चर्चा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांकडे त्याच्या विरोधात सबळ पुरावे असल्याची बाब समोर आली आहे. राजवर अश्लील चित्रपट तयार करणे तसेच ते व्हिडिओ एका अॅपच्या माध्यमातून दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. न्यायालयानं आता त्याला २३ जुलैपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

क्राईम ब्रँचचं असं म्हणणं आहे की, राज कुंद्रा यासगळ्या प्रकरणात मास्टर माईंड आहे. त्याचा याप्रकरणात मोठा सहभाग आहे. यापूर्वी देखील त्याच्यावर फेब्रुवारी महिन्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. राजनं ब्रिटनमध्ये राहत असलेल्या केनरिन या भावाच्या नावानं एक कंपनी तयार केली होती. त्यामाध्यमातून पॉर्न फिल्म दाखवली जात होती. या चित्रपटाचे व्हिडिओ हे भारतात चित्रित केले जात होते. आणि व्ही ट्रान्सफरच्या माध्यमातून ते परदेशात पाठवले जायचे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com