रेल्वेने प्रवास करताय? मग ही बातमी आधी वाचा

रेल्वेने प्रवास करताय? मग ही बातमी आधी वाचा

दिल्ली | Delhi

देशात करोनाचा (COVID19) शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारने (Central Govt) लॉकडाऊन (lockdown) लागू केला होता. दरम्यान करोनाच्या (corona wave) दोन भयावह लाटांनंतर देश पूर्वपदावर आला असून, रेल्वेनंही नागरिकांच्या सुविधेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

करोना काळात रेल्वेने (railway) अनेक लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना विशेष मेल आणि विशेष एक्सप्रेस (special train) असा दर्जा दिला होता. तसेच या गाड्यांच्या दरांमध्ये वाढ केली होती.

नागरिकांनी करोना काळात प्रवास टाळावा म्हणून मुद्दाम हा उपाय करण्यात आला होता. आता कोरोना संकट नियंत्रणात येऊ लागल्यामुळे रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांचा विशेष हा दर्जा रद्द करण्याचा तसेच कोरोना काळातील दरवाढ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून (Ministry of Railways) काढण्यात आलेल्या परिपत्रकातून ही माहिती देण्यात आली आहे. करोना आधी आकारले जाणारे भाडेदर लागू करण्यात आले आहेत. म्हणजे स्पेशल रेल्वेने प्रवास करण्यासाठी आकारले जाणारे भाडे आता बंद करण्यात आले आहेत.

त्याचबरोबर आता जनरल तिकीट पद्धतही बंद करण्यात आली आहे. आरक्षण मिळालेल्या आणि वेटिंगवर असलेल्यांनाच प्रवास करता येणार असल्याचं रेल्वे मंत्रालयाने परिपत्रकातून स्पष्ट केलं आहे. जनरल बोगीसाठीचं तिकीट असणार नाही.

महत्त्वाची बाब म्हणजे निर्णय लागू होण्याआधी ज्यांनी तिकीट आरक्षित केलेले आहेत. त्यांच्याकडून वाढीव भाडं घेतलं जाणार नाही. त्याचबरोबर पैसेही परत केले जाणार नाही.

रेल्वेने विशेष गाड्या चालवून आणि तिकिटांमध्ये दरवाढ करुन २०२१-२२च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत ११३ टक्के जास्त उत्पन्न कमावले. यामुळे आर्थिक अडचणींमधून जात असलेल्या रेल्वेला दिलासा मिळाला. आता सेवा पूर्ववत करुन प्रवाशांना दिलासा दिला जाईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com