राहुल गांधी करोना पॉझिटिव्ह

संपर्कात आलेल्या लोकांनाही करोना चाचणी करण्याचा सल्ला
राहुल गांधी करोना पॉझिटिव्ह

दिल्ली l Delhi

काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांना करोनाची लागण झाली आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'मला करोना व्हायरस संसर्गाची सौम्य लक्षणे दिसत आहेत. माझी करोना व्हायरस चाचणी नुकतीच पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे करोना नियमांचे पालन करत माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी प्रोटोकॉलनुसार आपली करोना व्हायरस चाचणी करुन घ्यावी'. असे आवाहन त्यांनी केले आहे.

राहुल गांधीनी करोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यासोबत त्यांनी इतर नेत्यांनाही मोठ्या जाहीर सभांच्या परिणामांबाबत विचार करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

दरम्यान, काल सोमवारी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना करोनाची लागण झाली. मनमोहन सिंग यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com