“हॅलो, मिस्टर मोदी…”; राहुल गांधींनी आपला फोन काढत पुन्हा केला 'तो' आरोप

“हॅलो, मिस्टर मोदी…”; राहुल गांधींनी आपला फोन काढत पुन्हा केला 'तो' आरोप

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी सिलिकॉन व्हॅलीतील स्टार्टअप उद्योजकांसह बैठक घेतली. यावेळी फोन टॅपिंगचा मुद्दा येताच त्यांनी आपला आयफोन हातात घेतला आणि मोदी सरकारवर (Modi Government) टीका केली आहे...

राहुल गांधी यांनी पेगासस आणि इतर तांत्रिक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यावेळी ते म्हणाले की, मला माहित होतं की माझा फोन टॅप केला जातो आहे. मात्र मी त्यामुळे त्रस्त नाही आणि त्यांनी आयफोन काढला कानाला लावला आणि म्हणाले हॅलो मिस्टर मोदी. त्यांनी केलेल्या या मिश्कील कृतीनंतर ते हसूदेखील लागले.

“हॅलो, मिस्टर मोदी…”; राहुल गांधींनी आपला फोन काढत पुन्हा केला 'तो' आरोप
हृदयद्रावक! मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच आईचेही निधन

राहुल गांधी म्हणाले की, मला वाटतंय माझ्या या आयफोनचं टॅपिंग होते आहे. भारतासारख्या देशात एका व्यक्तीप्रमाणेच एक डेटा सुरक्षेचेही काही विशिष्ट नियम असले पाहिजेत. जर देशाला वाटत असेल की फोन टॅप झाला पाहिजे तर त्यावर कुणी काहीही म्हणू शकत नाही. याबाबत मला तरी असेच वाटते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

“हॅलो, मिस्टर मोदी…”; राहुल गांधींनी आपला फोन काढत पुन्हा केला 'तो' आरोप
प्रतीक्षा संपली! उद्या दहावीचा निकाल; कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या

जर देशाला वाटत असेल की विशिष्ट लोकांचे फोन टॅप झाले पाहिजेत तर त्याविरोधात काय लढा देणार? मला वाटते की मी जे काही काम करतो आहे ते देशाच्या समोर आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com