पुष्कर सिंह धामी यांनी घेतली उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

पुष्कर सिंह धामी यांनी घेतली उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

नवी दिल्ली / New Delhi - उत्तराखंडमध्ये संवैधानिक अडचणीमुळे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) यांनी शुक्रवारी रात्री राज्यपाल बेबी मौर्या यांच्याकडे राजीनामा दिला. रावत यांच्या राजीनाम्यानंतर तीन नावे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होती परंतु त्यापैकी, खाटीमा विधानसभा आमदार पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.

आज त्यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. धामी उत्तराखंडचे 11वे मुख्यमंत्री बनले आहेत. देहरादून स्थित राजभवनवर राज्यपाल बेबी रानी मौर्य यांनी मुख्यमंत्री पदाची धामी यांच्याकडून शपथ घेतली. पुष्कर धामी यांच्या व्यतिरिक्त भाजपचे ज्येष्ठ नेते सतपाल महाराज, हरक सिंह रावत, बंशीधर भगत, यशपाल आर्य, बिशन सिंह सुफाल, सुबोध उनियाल, अरविंद पांडेय, गणेश जोशी, धन सिंह रावत, रेखा आर्य आणि यतीश्‍वरानंद यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.

दरम्यान, उत्तराखंडमधील अनेक भाजपचे आमदार पुष्कर सिंह धामी यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी नाराज असल्याचे सांगितले जात आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सतपाल महाराज यांनी शपथविधीपूर्वी पुष्कर सिंह धामी यांची स्वतः जाऊन भेट घेतली. नाराज आमदारांची मनधरणी करण्याची जबाबदारी भाजपचे खासदार अजय भट्ट यांच्यावर सोपवली होती. अजय भट्ट अनेक आमदारांसोबत बोलले. तसेच त्यावेळी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री बीसी खंडूरीसह काही नेत्यांनी धामी यांची भेट घेतली आहे.

पुष्कर सिंह धामी यांनी घेतली उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ
‘सरकारला फक्त आदित्य ठाकरे-पार्थ पवारच्या करिअरची चिंता’
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com