पठाणकोटमधील आर्मी कॅम्पच्या गेटवर ग्रेनेड हल्ला

पठाणकोटमधील आर्मी कॅम्पच्या गेटवर ग्रेनेड हल्ला

दिल्ली | Delhi

पंजाबमधील (Panjab) पठाणकोट (Pathankot) शहरात असणाऱ्या आर्मी कॅम्पजवळ (Army camp) सोमवारी सकाळी ग्रेनेडचा स्फोट (grenade blast) झाला. धिरपुल येथील आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी गेटवर (Triveni Gate) हा स्फोट झाला.

मिळालेल्या माहितीनुसार बाईकस्वार अज्ञातांनी हे ग्रेनेड फेकले. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेजद्वारे (CCTVs footage) बाईकस्वारांचा शोध सुरू आहे. अचानक झालेल्या ग्रेनेड हल्ल्यामुळे पोलिसांकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

पठाणकोट भारतातील सर्वाधिक महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक आहे. येथे वायुसेनेचं कॅम्प, लष्कराचा दारूगोळ्याचा डेपो आणि लष्कराच्या दोन ब्रिगेड आहेत. जानेवारी २०१६ मध्ये पठाणकोटमधील वायुसेनेच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com