चंदीगढ -

पंजाबमध्ये आढळलेल्या नव्या करोना रूग्णांपैकी तब्बल 81 टक्के रूग्णांमध्ये घातक असलेला करोनाचा

ब्रिटिश स्ट्रेन आढळला आहे.

दरम्यान, राज्यातील तरूणांनाही सरसकट करोना प्रतिबंधक लस देण्यासाठी केंद्राने परवानगी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली आहे.

राज्यात जे 401 नमूने घेण्यात आले होते, त्यातील 81 टक्के नमून्यांमध्ये ब्रिटनचा स्ट्रेन आढळून आला आहे व ते काळजीचे माठे कारण आहे.

हा विषाणू अत्यंत घातक असून सगळ्यांनी करोना विषयक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहनही मुख्यमंत्री अमरिंदर यांनी केले आहे.