नवी दिल्ली -

नवे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी गेल्या अडीच महिन्यांपासून शेतकर्यांचे दिल्लीत आंदोलन सुरु आहे. दरम्यान नव्या कृषी कायद्यांविरोधातील

आंदोलन अजून तीव्र करण्याचा निर्णय शेतकरी नेत्यांनी घेतला आहे. त्यानूसार येत्या 18 फेब्रुवारीला देशव्यापी रेल रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी 12 ते 4 असे चार तास हे आंदोलन केलं जाणार आहे. आंदोलनाचा भाग म्हणून आंदोलनकर्त्यांनी 12 फेब्रुवारीपासून राजस्थानाच्या रस्त्यांवरील सर्व टोल वसुली करु न देण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी संयुक्त किसान मोर्चाची बैठक झाली त्यावेळी हे निर्णय घेण्यात आले.

संयुक्त किसान मोर्चाने प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, 14 फेब्रुवारीला देशभरात कॅण्डल मार्च आणि मशाल मोर्चा काढला जाणार आहे. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी हा मोर्चा काढला जाईल.