...तोपर्यंत घरी जाणार नाही; पंतप्रधानांच्या घोषणेनंतर आंदोलक शेतकरी ठाम

...तोपर्यंत घरी जाणार नाही; पंतप्रधानांच्या घोषणेनंतर आंदोलक शेतकरी ठाम

दिल्ली l Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचा विरोध होत असलेले तिन्ही कृषी कायदे (Farm Law) मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना सांगितले आहे. हे कायदे मागे घेण्याची घोषणा करतानाच शेतकऱ्यांना त्यांनी घरी जाण्याचं आवाहन केलं आहे. (Farm laws to be cancelled)

...तोपर्यंत घरी जाणार नाही; पंतप्रधानांच्या घोषणेनंतर आंदोलक शेतकरी ठाम
PayTM : पेटीएमचा शेअर का गडगडला?, जाणून घ्या काय म्हणताय तज्ज्ञ

मात्र, मोदींच्या या आवाहनानंतरही शेतकरी घरी जायला तयार नाहीत. जोपर्यंत संसदेत कायदे रद्द होत नाहीत, तोपर्यंत माघार नाहीच, असं शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी एक ट्विट करून ही घोषणा केली आहे.

राकेश टिकैत यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, आंदोलन तात्काळ वापस घेतलं जाणार नाही. आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहोत, ज्या दिवशी संसदेत कृषी कायदे रद्द केले जातील. तसेच सरकार MSP सह शेतकऱ्यांच्या अन्य मुद्द्यांवर देखील चर्चा करेल, असं राकेश टिकैत म्हणाले.

...तोपर्यंत घरी जाणार नाही; पंतप्रधानांच्या घोषणेनंतर आंदोलक शेतकरी ठाम
शेतकरी आंदोलनाला मोठं यश! तीनही कृषी कायदे रद्द होणार, पंतप्रधान मोदींची घोषणा
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com