नवी दिल्ली -

एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे खासगीकरण करण्याची

घोषणा केली आहे. सरकारच्या या धोरणाविरोधात विरोधात यूनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने सरकारी बँक कर्मचार्यांना 15 आणि 16 मार्चला संपावर जाण्याची हाक दिली असून या दोन्ही दिवशी सरकारी बँकांचे कामकाज पूर्णपणे ठप्प होणार आहे.

या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी हैदराबादमध्ये यूनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने बैठक बोलावली होती. या बैठकीत दीर्घ चर्चेनंतर खासगीकरणाच्या विरोधात संपावर जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान,,, देशातील प्रमुख शहरांत बँक कर्मचारी आणि अधिकारी बँक खासगीकरणाविरोधात निदर्शने करत आहेत.