मोफत ‘यूपीआय’वर बँका उकळताहेत पैसे
देश-विदेश

मोफत ‘यूपीआय’वर बँका उकळताहेत पैसे

ऑनलाईन व्यवहारात घट होण्याची शक्यता

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

यूपीआय अर्थात युनिफाइड पेमेंट इंटरफेस व्यवहार पूर्णपणे मोफत असेल अशी ग्वाही मोदी सरकारने दिली आहे. पण आता

खासगी बँकानी काही ठराविक व्यवहारानंतर त्याचे शुल्क आकारण्यास सुरूवात केली आहे. private banks

एका व्यक्तीने यूपीआयच्या माध्यमातून एका महिन्यात 20 व्यवहार केल्यानंतर खासगी बँक प्रतिव्यवहार 2.5 ते 5 रुपये आकारत आहेत. लॉकडाऊनच्या काळात खासगी बँकांनी यूपीआय च्या नावाखाली ग्राहकांकडून 8 टक्के शुल्क आकारले आहे. Unified Payments Interface (UPI)

एका इंग्रजी दैनिकाने याबाबत वृत्त दिले आहे. 2016 साली नोटबंदी जाहीर झाल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन व्यवहार वाढले होते. तसेच लॉकडाऊनमध्येही लोक रोख रकमेच्या ऐवजी ऑनलाईन व्यवहारांना पसंती देत आहेत. हे व्यवहार पूर्णपणे मोफत असतील असे मोदी सरकारने जाहीर केले होते.

बँकांनी या शुल्काचे समर्थन करत म्हटले आहे, 20 व्यवहारानंतर ग्राहकांकडून छोटे व्यवहार कमी होण्यासाठी हे शुल्क आकारण्यात येत आहेत. जास्त व्यवहार झाल्यामुळे बँकेच्या व्यवस्थेवर ताण पडतो. म्हणून मोठे व्यवहार झाले पाहिजे असे मत बँकेने व्यक्त केले आहे.

यूपीआय च्या माध्यमातून केलेले व्यवहार मोफत असतील असे सरकारने म्हटले आहे. पण बँका आता या व्यवहारांच्या मागे शुल्क आकारत आहेत. तसेच कुठलेही पेमेंट किंवा देयक भरल्यास शुल्क आकारले जात नाहीत परंतु व्यवहारांमागे शुल्क आकाराले जाईल असे बँकेने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, यूपीआय व्यवहाराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. बहुतांश मोबाईलमधून जे काही व्यवहार होतात ते यूपीआयच्या माध्यमातूनच होतात. ऑनलाईन व्यवहारांमुळे लोक बँकिंगकडे अधिक आकृष्ट झाले होते. त्यात नागरिकांचा वेळ वाचत होता आणि सुट्यांचाही मनस्ताप होत नव्हता. तसेच हे व्यवहार मोफत असल्यामुळे अनेक लोक वेगवेगळे मोबाईल पेमेंट ऍप वापरून व्यवहार करत होते. आता खासगी बँका त्यावर शुल्क लावत असल्याने ऑनलाईन व्यवहारात घट होण्याची शक्यता आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com