
दिल्ली | Delhi
महागाईमुळे (inflation) सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत आणि खाद्यतेलापासून ते पेट्रोल (petrol), डिझेलपर्यंत (disel) सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी देशातील वाढत्या महागाईविरोधात आंदोलन केलं आहे.
अखिल भारतीय रास्त भाव धान्य दुकानदारांच्या फेडरेशनच्यावतीनं आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात प्रल्हाद मोदी सहभागी झाले होते. प्रल्हाद मोदी हे अखिल भारतीय रास्त भाव धान्य दुकानदारांच्या फेडरेशनचे उपाध्यक्ष आहेत. नवी दिल्लीत जंतरमतर विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं.
यावेळी प्रल्हाद मोदी म्हणाले की, 'अखिल भारतीय रास्त भाव धान्य दुकानदारांच्या फेडरेशनचे एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करणार आहे. ज्यामध्ये आमच्या दीर्घकालीन प्रलंबित मागण्यांची यादी देण्यात येणार आहे. वाढत्या महागाईमुळे दुकाने चालवण्यासाठी जादा खर्च करावा लागत आहे. अशा स्थितीत आमच्या मार्जिनमध्ये केवळ २० पैसे प्रति किलो वाढ करणं, ही क्रूर चेष्टा आहे. आम्ही केंद्र सरकारला विनंती करतो की त्यांनी आम्हाला दिलासा द्यावा आणि आमची आर्थिक दुर्दशा संपवावी.'
तसेच, अखिल भारतीय रास्त भाव धान्य दुकानदारांच्या फेडरेशनच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बुधवारी एक बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील दिशा ठरवली जाईल, असे प्रह्लाद मोदी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर माझा भाऊ पंतप्रधान आहे, तर मग मी काय उपाशी मरायचे का? संबंधित मागण्यासाठी आपण असोसिएशनच्या सर्व निर्णयांसोबत उभे राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.