पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली करोना लस

देशवासीयांना केले हे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली करोना लस

दिल्ली | Delhi

भारतात लसींना परवानगी मिळाल्यानंतर गेल्या महिन्यात म्हणजेच १६ जानेवारी रोजी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती. करोना लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडला असून आजपासून (सोमवार) करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लसीकरण मोहिमेत सहभागी झाले असून सर्वात प्रथम करोनाची लस घेतली आहे. मोदींनी ट्विटरला फोटो ट्विट करत ही माहिती दिली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी म्हंटले आहे की, “एम्स रुग्णालयात करोनाचा पहिला डोस घेतला. करोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीने काम केलं ते कौतुकास्पद आहे,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. मोदींनी यावेळी लसीकरणासाठी पात्र देशवासियांना आवाहन केलं असून भारताला करोनामुक्त बनवूयात असं म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन ही लस टोचून घेतली. अंतिम टप्प्याच्या चाचण्या होण्यापूर्वीच या लसीला मान्यता मिळाल्याने कोव्हॅक्सीनच्या सुरक्षिततेतविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोव्हॅक्सीन ही देशी लस घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: कोव्हॅक्सीन टोचून घेतल्याने या लसीविषयीची शंका दूर होण्याची शक्यता आहे. परिणामी लसीकरण मोहिमेचा वेगही वाढण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, आजपासून ६० वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. तसेच ४५ ते ५९ वयोगटातील इतर आजार असलेल्यांनाही लस दिली जाईल. सरकारी लसीकरण केंद्रावर मोफत लस दिली जाईल आणि त्याचा पूर्ण खर्च केंद्र सरकार करणार आहे. तर खासगी हॉस्पिटलमध्ये देणाऱ्यात येणाऱ्या करोना लशीच्या प्रत्येक डोसची किंमत २५० रुपये असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली करोना लस
आजपासून सामान्यांचे लसीकरण, अशी करा नोंदणी

आयुष्यमान भारतशी संलग्न असलेले देशातील १० हजार हॉस्पिटल आणि केंद्रीय आरोग्य योजनेतील ६८७ रुग्णालयात कोरोनाची लस दिली जाईल. भारतात लसींना परवानगी मिळाल्यानंतर गेल्या महिन्यात म्हणजेच १६जानेवारी रोजी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती. पण सुरुवातीच्या टप्प्यात फक्त कोव्हिड-योद्ध्यांचंच लसीकरण केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com