Narendra Modi
Narendra Modi
देश-विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ जुलैला करणार "मन की बात"

देशवासीयांकडून मागितल्या सूचना..

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ जुलै रोजी "मन की बात" करणार आहेत. पंतप्रधान मोदींनी आज सकाळी ट्विट करून याबद्दल माहिती दिली.

पंतप्रधान मोदींनी केलेल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे. "मला विश्वास आहे की छोट्या प्रेरणेच्या सामूहिक प्रयत्नांमध्ये सकारात्मक बदल कसा होतो. आपणास अश्या गोष्टी देखील माहीत असतील की ज्याने लोकांच्या जीवनात बदल झाला आहे. त्या होती २६ जुलैला होणाऱ्या "मन की बात" या कार्यक्रमासाठी सुचवा."

आकाशवाणीवरून "मन की बात" कार्यक्रम प्रसारित होणार आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी देशातील नागरिकांकडून सूचना मागविल्या आहेत. देशातील नागरिक १८००११७८०० या नंबरवर किंवा नमो अँपवर आपल्या सूचना नोंदवू शकतात.

Deshdoot
www.deshdoot.com