मोदींचे ट्विटरवर सहा कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स
देश-विदेश

मोदींचे ट्विटरवर सहा कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स

10 महिन्यांत चाहत्यांच्या संख्येत एक कोटीने वाढ

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi - ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांच्या फॉलोअर्सची संख्या सहा कोटींपेक्षा अधिक आहे, तर मोदी स्वत: जगातील 2,354 लोकांना फॉलो करतात.

जगभरातील सर्वाधिक चाहते असणार्‍या नेत्यांच्या यादीत मोदी तिसर्‍या स्थानावर आहेत. 2009 मध्ये त्यांनी ट्विटरवर(Twitter) खाते उघडले होते.

पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता अजूनही कायम असल्याचे यावरून दिसून येते. सप्टेंबर 2019 मध्ये ट्विटरवर मोदी यांच्या चाहत्यांची संख्या 5 कोटींवर पोहोचली होती. अवघ्या 10 महिन्यांत त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत एक कोटीने वाढ झाली.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा(Barack Obama) यांचे 12 कोटी फॉलोअर्स (followers) आहेत. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे 8 कोटी 37 लाख फॉलोअर्स आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com