पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथांच्या चरणी; आदि शंकराचार्यांच्या मुर्तीचं केलं अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथांच्या चरणी; आदि शंकराचार्यांच्या मुर्तीचं केलं अनावरण

दिल्ली | Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज दिवाळीनिमित्त (Diwali) केदारनाथच्या (Kedarnath) दौऱ्यावर आले होते. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा हा पाचवा केदारनाथ दौरा होता. पंतप्रधान मोदींनी यावेळी रुद्राभिषेक करत भक्तीभावाने बाबा केदारनाथांची पुजा केली. या दौऱ्यात त्यांनी गुरु शंकराचार्यांच्या मूर्तीचं अनावरण केलं.

तसेच पंतप्रधान मोदींनी केदारनाथमध्ये १३० कोटी खर्चाच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले. यासोबतच ४०० कोटींहून अधिक रकमेच्या कामांचे उद्घाटन आणि पायाभरणीही करण्यात आली आहे. याठिकाणी पर्यटन सुविधा केंद्र निर्माण, आधुनिक रूग्णालय, रेन्ट सेंटर या सुविधा भाविकांसाटी उपलब्ध होईल. तसेच यावेळी मोदींनी केदारनाथमधील विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त केलं.

'जय बाबा केदार'च्या उद्गाराने पंतप्रधान मोदींनी भाषणाची सुरुवात केली. केदारनाथला जेव्हाही येतो तेव्हा येथील कणाकणात मिसळून जातो. येथील हिमालय आणि बाबा केदारनाथ मला खेचून आणतात. काल सैन्यासोबत दिवाळी साजरी करायला मिळाली आणि आज गोवर्धन पूजेच्या दिवशी केदारनाथांचं दर्शन करण्याचा योग आला. एका दिव्य अनुभूतीचा अनुभव आला. शंकरांच्या डोळ्यांतून तेज प्रवाहित होत आहे. जे भव्य भारताचा विश्वास व्यक्त करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ येथे म्हणाले.

आज सर्व मठ, १२ ज्योतिर्लिंग, अनेक शिवालय, शक्ती धाम, अनेक तीर्थ क्षेत्रांशी संबंधित महापुरुष, शंकराचार्यांच्या परंपरेशी जोडले गेलेले ऋषी मुनी, श्रद्धाळू सर्वच जण आपल्याला आशीर्वाद देत आहेत. उपनिषदांमध्ये आदि शंकराचार्यांच्या रचनांचा समावेश करण्यात आला असून नेति नेति म्हणून एक भाव विश्व का विस्तार करण्यात आला आहे, असं मोदी म्हणाले.

काही वर्षांपूर्वी केदारनाथचं मोठं नुकसान झालं. ते अकल्पनीय होतं. केदारनाथचं नुकसाना पाहून पुन्हा केदारनाथ उभं राहिल असं कुणाला वाटलं नव्हतं. मात्र, केदारनाथ पुन्हा त्याच वैभवाने उभे राहील असं माझं मन सांगत होतं. आणि झालंही तसंच. केवळ ईश्वराच्या कृपने केदारनाथचं विकास कार्य पूर्ण होऊ शकलं, असंही त्यांनी सांगितलं.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com