PHOTO : पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज आशियातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन, जाणून घ्या वैशिष्ट्ये

PHOTO : पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज आशियातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन, जाणून घ्या वैशिष्ट्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Noida International Airport) भूमिपूजन करणार आहेत. हे विमानतळ पूर्ण झाल्यानंतर पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे उत्तर प्रदेश (Uttar pradesh) हे देशातील एकमेव राज्य ठरणार आहे. हे देशातील पहिले शून्य उत्सर्जन करणारे विमानतळ असेल.

हे विमानतळ दिल्ली-एनसीआरमधील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल आणि त्याच्या बांधकामानंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दबावही कमी होईल.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विमानतळाच्या भूमिपूजनाचा पहिला टप्पा २०२३-२४ मध्ये पूर्ण होईल. पहिला टप्पा १०,०५० कोटी रुपये खर्चून विकसित केला जात आहे.

६२०० हेक्टरमध्ये हे आशियातील सर्वात मोठे विमानतळ असेल. पहिल्या टप्प्यात १३३४ हेक्टरमध्ये दोन धावपट्टी बांधण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात १.२ कोटी प्रवासी प्रवास करतील. विमानतळावर मालवाहतुकीच्या सुविधेशिवाय एमआरओ यंत्रणाही असणार आहे.

या विमानतळावर एकूण ५ धावपट्टी असतील. पहिल्या टप्प्यात २ धावपट्टी तयार केल्या जातील. तर दुसऱ्या टप्प्यात ३ धावपट्टी तयार केल्या जातील. धावपट्टीची लांबी ४ किलोमीटरहून अधिक असणार आहे.दोन्ही धावपट्टीवर एकूण १८६ विमान पार्क करण्यासाठी स्टँड केले जातील.

विमानतळाच्या जवळ सार्वजनिक वाहतुकीच्या रुपात आणखीन एक पर्याय उपलब्ध असेल. ज्यामध्ये रेल्वे स्टेशनचा समावेश असेल. येथून तुम्ही मेट्रो किंवा हायस्पीड ट्रेनमधून प्रवास करून जवळच्या शहरात जाऊ शकता. मेट्रो स्टेशनच्या जवळ हवाई प्रवाशांना बसण्यासाठी एक वेगळ्या टर्मिनलची व्यवस्था केली जाईल.

दक्षिण धावपट्टीच्या उजव्या बाजूला पावसाचे पाणी साठवण्यासाठी एक तलाव बांधले जाईल. याशिवाय यमुना एक्स्प्रेसवे, इस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेसवे आणि जवळील मुख्य रस्ते आणि राजमार्गांना नोयडा विमानतळ जोडले जाईल.

या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून फक्त परदेशातील प्रवास होणार नाही तर देशातील सर्वात मोठे कार्गो हब विमानतळावर असणार आहे. विमानतळावरील कार्गो टर्मिनलची क्षमता २० लाख मेट्रिक टन असेल, ती वाढवून ५० लाख मेट्रिक टन करण्यात येईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com