पंतप्रधान मोदींचा दबदबा कायम; 'या' बड्या नेत्यांना मागे टाकत पुन्हा बनले नंबर १

पंतप्रधान मोदींचा दबदबा कायम; 'या' बड्या नेत्यांना मागे टाकत पुन्हा बनले नंबर १

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवडले गेले आहेत. एका सर्वेक्षणात जाहीर करण्यात आलेल्या यादीत PM मोदी 78 टक्के जागतिक नेत्यांच्या मान्यता रेटिंगसह अव्वल स्थानावर आहेत...

मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणानुसार, PM मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden), ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्यासह 16 देशांच्या दिग्गज नेत्यांना मागे टाकले आहे. पंतप्रधान मोदींना जगभरातील नेत्यांमध्ये सर्वोच्च रेटिंग मिळाली आहे.

या यादीत मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर (Mexico President Andres Manuel Lopez Obrador) दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना 68 टक्के रेटिंग मिळाली आहे. तर, तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे पीएम अल्बानीज आहेत, ज्यांचे रेटिंग 58 टक्के आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी चौथ्या क्रमांकावर आहेत. मेलोनी याचे रेटिंग 52 टक्के आहे.

पंतप्रधान मोदींचा दबदबा कायम; 'या' बड्या नेत्यांना मागे टाकत पुन्हा बनले नंबर १
सिन्नर : 'त्या' खुनातील तरुणाला बेड्या; वडिलांचे अपहरण केल्याच्या संशयावरून केली होती हत्या

याशिवाय, भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक या यादीत 10 व्या स्थानावर आहेत. जागतिक नेत्यांमध्ये त्यांचे रेटिंग 30 टक्के आहे. सर्वेक्षणानुसार, 2021 नंतर पीएम मोदींची लोकप्रियता आणखी वाढली आहे. त्यामुळे ते अव्वल स्थानावर विराजमान झाले आहेत.

पंतप्रधान मोदींचा दबदबा कायम; 'या' बड्या नेत्यांना मागे टाकत पुन्हा बनले नंबर १
दिंडोरीतील 'त्या' दरोडयाची उकल; आंतरराज्यीय टोळीतील चार दरोडेखोर जेरबंद
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com