महागाईचे चटके! पॅरासिटामॉलसह ८०० औषधांचे दर वधारणार

medicine
medicine

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

इंधन दरवाढीनंतर (Fuel Price Hike) आता सर्वसामान्यांना आणखी एक झटका मिळणार आहे. आता जीवनावश्यक ८०० औषधांच्या (Medicines) किमतीत वाढ होणार आहे. यामुळे सर्वसामन्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे...

याबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला असून दि, ०१ एप्रिलपासून औषधांचे दर वाढतील. यात डायबिटीज (Diabetes), कॅन्सर (Cancer), हायबीपीची (High bp) औषधांच्या दरात वाढ होईल. तसेच पॅरासिटामॉलचे (Paracetamol) सुद्धा दर वाढणार आहेत.

medicine
Visual Story : मोस्ट अवेटेड 'KGF Chapter 2' चे गाणे 'या' दिवशी होणार रिलीज

तसेच विविध 800 प्रकारची औषधांचे भाव वाढतील (Medicines Price Hike). ही दरवाढ सुमारे 10 टक्क्यांनी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यात अँटीव्हायरल (Antiviral), पेनकिलर (Painkiller), अँटीबायोटिक्ससह (Antibiotics) इतर आवश्यक औषधांच्या दरवाढीचे संकेत देण्यात आले आहेत. एप्रिलपासून ही दरवाढ होणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com