
मुंबई | Mumbai
सध्या अनेक वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होत आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच दूध (Milk) आणि कमर्शिअल सिलेंडरच्या (Commercial Cylinder) दरात वाढ झाली. यापाठोपाठ आता मॅगीच्या (Maggi) दरातदेखील वाढ झाली आहे...
याआधी मॅगीची (Maggi) किंमत १२ रुपये होती. मात्र आता अनेकांचा आवडतीचा नाश्ता असणारी मॅगी १४ रुपयांना मिळणार आहे. नेस्ले (Nestle) कंपनीने याबाबत घोषणा केलेली आहे. नेस्ले इंडियाने (Nestle India) ने मॅगी नूडल्स (Maggi Noodles) च्या किंमतीत ९ ते १६ टक्क्यांची वाढ केली आहे.
त्यामुळे ७० ग्रॅमची मॅगी आता १२ ऐवजी १४ रुपयांना मिळेल. मॅगी मसाला नूडल्स (Maggi Masala Noodles) १४० ग्रॅमची किंमत ३ रुपयांनी महागली आहे. तर ५६० ग्रॅमचे पाकिट ९६ ऐवजी १०५ रुपयांना मिळणार आहे.