डेन्मार्कमध्ये पंतप्रधान मोदींचे मराठमोळ्या थाटात केलं स्वागत; VIDEO बघाच!

डेन्मार्कमध्ये पंतप्रधान मोदींचे मराठमोळ्या थाटात केलं स्वागत; VIDEO बघाच!

दिल्ली | Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) सध्या युरोपच्या (Europe) दौऱ्यावर आहेत. आपल्या कार्यक्रमातून ते युरोपमधल्या भारतीयांना आवर्जून भेटत आहेत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत.

याच दरम्यान जर्मनीत त्यांचं मराठी पद्धतीने स्वागत करण्यात आलं. तिथल्या मराठी लोकांनी पारंपारिक वेषभूषा करत, ढोल-ताशाच्या गजरात लेझिम खेळत पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं.

पंतप्रधान मोदींचं हे स्वागत सध्या सोशल मीडियावर जोरदार गाजत आहे. जर्मनीच्या पंतप्रधान कार्यालयासमोर मराठी युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात आणि ढोल-ताशांच्या गजरात पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत केले.

पंतप्रधान मोदी यांचा या वर्षातील हा पहिलाच दौरा असून, तीन दिवसांच्या तीन देशांच्या या दौऱ्यादरम्यान ६५ तासांच्या कालावधीत ते २५ कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणार आहेत, अशी माहिती सरकारमधील सूत्रांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.