<p>नवी दिल्ली</p><p>पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सहा वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांनी टि्वट करत यासंदर्भात माहिती दिली.</p>.<p>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार दुपारी टि्वट करत म्हटले की, आज संध्याकाळी ६ वाजता राष्ट्राच्या नावाने संदेश देईल. तुम्ही जरुर ज्वॉईन व्हा. </p><p>नवरात्रौत्सव सुरु आहे. पुढच्या महिन्यात दिवाळीचा सण आहे. सणांचे हे दिवस देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. सध्या देशात लॉकडाऊन ५.० सुरु आहे. देशात अनेक गोष्टी सुरु झाल्या आहेत. ट्रेन, विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरु झाली नसली, तरी मेट्रो, रस्त्यावरील वाहतूक, हॉटेल, सिनेमा हॉल सुरु झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने काय घोषणा करणार? नवीन पॅकेज जाहीर करणार का? कर्जदारांना दिलासा मिळणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या मोदींच्या संबोधनात अपेक्षित आहेत.</p>