Photo : पंतप्रधान मोदींनी घेतली पोप फ्रान्सिस यांची भेट, 'या' विषयावर झाली चर्चा

Photo : पंतप्रधान मोदींनी घेतली पोप फ्रान्सिस यांची भेट, 'या' विषयावर झाली चर्चा

दिल्ली | Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) चार दिवसांच्या परदेश दौऱ्यावर इटलीत (Italy) दाखल झाले आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज व्हॅटिकन सिटी (Vatican City) येथे शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेपूर्वी कॅथोलिक ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च नेते पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांची भेट घेतली.

पंतप्रधाना मोदी (Modi) यांनी पोप यांना जादू की झप्पी दिल्यानंतर विविध विषयांवर मोदींनी त्यांच्याशी चर्चा केली. करोना (covid19) कालावधी, सर्वसाधारण जागतिक विषयांवर चर्चा आणि विश्वशांती ठेवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे मोदींनी पोप फ्रान्सिस यांना भारतात येण्याचेही निमंत्रण दिले आहे. (PM Modi meets Pope Francis, invites him to India)

यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात पोप जॉन पॉल II (Pope John Paul II) यांनी १९९९ मध्ये भारताला भेट दिली होती. व्हॅटिकनमध्ये पंतप्रधान मोदी आणि पोप फ्रान्सिस यांच्यात केवळ २० मिनिटांची बैठक होणार होती, परंतु दोघांमधील चर्चा सुमारे तासभर चालली.

स्थानिक वेळेनुसार साडेआठ वाजता पंतप्रधान मोदी व्हॅटिकनच्या प्रांगणात पोहोचले, तिथे व्हॅटिकनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. पंतप्रधान मोदींसोबत आलेल्या शिष्टमंडळात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचाही समावेश होता. पंतप्रधान मोदींनी प्रथम पोप यांची एकांतात भेट घेतली आणि त्यानंतर शिष्टमंडळ पातळीवरील बैठकीला हजेरी लावली.

दरम्यान पंतप्रधान शुक्रवारी त्यांनी राजधानी रोममधील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केले. यानंतर मोदींचे भारतीय समुदायाने मोठ्या जल्लोषात स्वागत केले. यावेळी काही महिलांनी संस्कृतमधून श्लोक म्हटले. विशेष म्हणजे, यावेळी नरेंद्र मोदींनी इटलीत वास्तव्यास असलेल्या नागपूरच्या माही गुरुजींशी चक्क मराठीत आणि त्यानंतर एका महिलेने मोदींना 'केम छो...' म्हटल्यावर तिच्याशी गुजरातीमध्येही संवाद साधला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com