Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात'मधील महत्वाचे मुद्दे, वाचा

Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात'मधील महत्वाचे मुद्दे, वाचा

दिल्ली | Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) रविवारी मन की बात (Mann Ki Baat) कार्यक्रमामध्ये देशाला संबोधित केले. या वर्षातील हा शेवटचा मन की बात कार्यक्रम होता.

पंतप्रधान मोदींनी या वर्षांच्या शेवटच्या 'मन की बात'मध्ये जनतेला नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या. यासोबत पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मधून देशवासियांना करोना संसर्ग आणि ओमिक्रॉनवरून सतर्क आणि सावध राहण्याचाही इशारा दिला. तसंच गेल्या १०० वर्षांतील सर्वात मोठ्या महामारीवर भारताने मात केली. हे आपल्या सामूहिक शक्तीचे यश आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात'मधील महत्वाचे मुद्दे, वाचा
नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या...

करोनारील लसीकरण मोहीमेत १४० कोटी डोसचा टप्पा देशाने ओलांडला आहे. हे देशातील प्रत्येक भारतीयाचे यश आहे. यातून प्रत्येक भारतीयाने व्यवस्थेवर दाखवेला विश्वास दिसून येतो. देशाच्या विज्ञानावर आणि शास्त्रज्ञांवर दाखवलेला विश्वास दिसतो. देशाचे नागरिक समाजाबद्दलची आपली जबाबदारी पूर्ण करत आहेत. हे भारतीयांच्या इच्छाशक्तीचा हा एक मोठा पुरावा आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूत हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू पावलेले कॅप्टन वरुण सिंग यांचं स्मरण केलं. वरुण सिंग यांना यंदाच शौर्य पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी त्यांनी त्यांच्या शिक्षकाला एक चिठ्ठी लिहिली होती. एवढ्या मोठ्या पदावर पोहोचल्यानंतरही वरुण सिंग आपलं मूळ विसरले नव्हते. त्यांची ही चिठ्ठी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अशीच आहे. एका जरी विद्यार्थ्याला मी प्रेरणा देऊ शकलो तर ही खूप मोठी गोष्ट असेल असं त्यांनी या चिठ्ठीत म्हटलं आहे. मात्र, त्यांनी केवळ एका विद्यार्थ्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला प्रेरित केलं आहे. भलेही पत्रातून ते विद्यार्थ्यांबाबत बोलत असतील, पण त्यांचा हा संदेश आपल्या संपूर्ण समाजासाठी आहे. साधारणपासून असाधारण बनण्याचा त्यांनी जो मंत्र दिला आहे. तो महत्त्वाचा आहे, असं मोदी म्हणाले.

Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात'मधील महत्वाचे मुद्दे, वाचा
ये एक सही कदम! मोदींच्या 'त्या' घोषणेनंतर राहुल गांधींचं ट्विट

मन की बात' कार्यक्रमात मोदींनी पुण्यातील भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरावर भाष्य केले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर या संशोधन केंद्रामार्फत इतर देशांच्या लोकांना महाभारताच्या महत्वाविषयी परिचय करून देण्यासाठी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केल्याचे मोदींनी सांगितले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातला अभ्यासक्रम अलिकडेच सुरू झाला असला तरी तो तयार करण्याला प्रारंभ तर १०० वर्षांपूर्वी झाला होता, असे मोदींनी सांगितले.

पर्यावरण मंत्रालयानं आपल्याकडे मोकळ्या झालेल्या जंकयार्डच्या जागेचं वेलनेस केंद्रामध्ये रूपांतर केल्याचे मोदींनी सांगितले. शहरी कार्य मंत्रालयानं एक स्वच्छ एटीएमही लावले आहे. लोकांनी कचरा द्यावा आणि त्या बदल्यात रोख रक्कम घेवून जावी, असा त्याचा उद्देश असल्याचे मोदी म्हणाले.

Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात'मधील महत्वाचे मुद्दे, वाचा
मुंबईत राहूनही मराठी येत नाही?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं

नागरी उड्डाण मंत्रालयाच्या विभागांनी झाडांची पडणारी सुकलेली पाने आणि जैविक कचरा यांचं जैविक खत बनवण्यास प्रारंभ केला आहे. या विभागांनी वाया जाणाऱ्या कागदांपासून लागणारी स्टेशनरीही बनवण्याचं काम सुरू केल्याचे मोदींनी आजच्या 'मन की बात' कार्यक्रमात सांगितले.

नव्याने सुरवात करताना स्वतःचे सामर्थ्य ओळखण्याची एक संधी आपल्याला मिळत असते. त्यामुळे विद्यार्जन करण्यासाठी प्रत्येकाने क्षणाक्षणाचा उपयोग केला पाहिजे, असे मोदींनी भाषण संपवताना म्हटलं.

Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात'मधील महत्वाचे मुद्दे, वाचा
Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?
Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात'मधील महत्वाचे मुद्दे, वाचा
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून
Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात'मधील महत्वाचे मुद्दे, वाचा
सुष्मिता सेन आणि रोहमन शॉलचे ब्रेकअप; पण...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com