नवी दिल्ली

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने आज पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता दिली. ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट १८ हजार कोटी रुपये ट्रान्सफर होणार आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपयांचा हफ्ता वर्ग झाला.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगने विविध राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी नवीन कृषी कायदा संदर्भात केंद्र सरकार ठाम असल्याचे मोदी यांनी सांगितले. पुर्वी सरकारने दिलेला पैसा शेवटच्या घटकापर्यंत पुर्ण पोहचत नव्हता. परंतु आता एका क्लिकवर ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये ट्रान्सफर झाले. आम्ही तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करत सर्वांच्या खात्यात पुर्ण निधी पोहचवत आहोत.

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील शेतकरी गणेश भोसले यांच्यांशी संवाद साधताना पशूपालनातून जास्त उत्पन्न मिळते की शेतीतून जास्त नफा मिळतो, असा प्रश्न विचारला. त्यावर गणेश भोसले म्हणाले, शेतातही होते आणि पशुपालनातून दूध मिळते, त्यातून जे पैसे मिळतात कुटुंब आणि शेती चालते.

यानंतर मोदी म्हणाले, पीकविमा योजनेचा लाभ तुम्हाला झाला का?

हा, मी अनेक वर्षांपासून पीकविमा योजनेचा लाभार्थी आहे.

तुम्हाला किती पैसे मिळाले?, मोदींचा सवाल

गेल्या वर्षी २५८० रुपयांचा हप्ता भरला होता. मात्र गेल्यावर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे मला ५४ हजार रुपयांची भरपाई मिळाली, असे गणेश भोसलेंनी सांगितलं.