करोना योध्यांसाठी क्रॅश कोर्सची निर्मिती; पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ

करोना योध्यांसाठी क्रॅश कोर्सची निर्मिती; पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ

दिल्ली | Delhi

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेना देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान देशातील नव्या करोना रुग्णांची संख्या घटत असल्याने करोनाची दुसरी लाट आता बर्‍यापैकी नियंत्रणात आली आहे. मात्र दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

देशातील संभाव्य करोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी एक लाख करोना योद्धा निर्माण करण्यात येणार आहेत. करोना यो्द्ध्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कस्टमाइज्ड क्रॅश कोर्स लाँच केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत व्हर्च्युअल पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, २६ राज्यांमध्ये १११ केंद्र उघडले जाणार आहेत.

देशभरातील एक लाखांहून अधिक कोव्हिड वॉरियर्सनी कौशल्यपूर्ण बनवण्याचे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे. कोविड योद्धांना होम केअर सपोर्ट, बेसिक केअर सपोर्ट, अ‍ॅडव्हान्स केअर सपोर्ट, इमरजन्सी केअर सपोर्ट नोकरीच्या क्षेत्रांसाठी प्रशिक्षण दिले जाईल. केंद्रीय कौशल विकास योजना ३.० अंतर्गत या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून या योजनेसाठी एकूण रु. २७६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमादरम्यान बोलतांना म्हणाले की, "देशातील अनेक राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी या क्रॅश कोर्सची मागणी केली होती. त्यामुळे देशातील सर्वोत्तम तज्ज्ञांच्या सहाय्याने केंद्र सरकारने हा क्रॅश कोर्स तयार केला आहे. त्या माध्यमातून दोन ते तीन महिन्यात एक लाख युवकांना प्रशिक्षत करण्यात येणार आहे. स्किलिंग, रिस्किलिंग आणि अपस्किलिंग या क्रॅश कोर्समध्ये सहा प्रकारचे विविध प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे आरोग्य क्षेत्राला एक नवीन उर्जा मिळणार असून युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

तसेच, स्किलिंग, रिस्किलिंग आणि अपस्किलिंगची गरज लक्षात घेता या आधीच केंद्र सरकारने केंद्रीय कौशल्य मंत्रालयाची स्थापना केली आहे असं पंतप्रधान म्हणाले. तत्रज्ञान वेगाने बदलतंय, त्यावेळी आपण त्यानुसार बदल आवश्यक असल्याचं सांगत अपस्किलिंग ही काळाची गरज असल्याचं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं. त्यासाठी देशात स्किल इंडिया मिशन सुरु केलं तसंच आयटीआयच्या संख्येतही वाढ केल्याचं पंतप्रधान म्हणाले.

येत्या २१ जूनपासून व्यापक लसीकरण

२१ जूनपासून लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे. यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. प्रत्येक नागरिकाला लोकांना मोफत लस देण्याचे सरकार वचनबद्ध आहे, आपल्याला करोना संदर्भातील प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल.करोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये करोना विषाणूचे वारंवार बदलणाऱ्या रुपामुळे कोणती आव्हाने येऊ शकतात हे आपण पाहिले आहे. हा विषाणू अजूनही आपल्या आजूबाजूला आहे आणि त्यात बदल होण्याची शक्यता आहे, म्हणून प्रत्येक उपचार पद्धती आणि प्रत्येक शक्यतांसह आपल्याला आपली तयारी अधिक वाढवावी लागेल. या साथीने वारंवार जगाची, प्रत्येक देशाची, संस्थाची, समाजाची, कुटूंबातील माणसांच्या मर्यादांची परीक्षा घेतली आहे. त्यामुळे आता ४५ वर्षावरीस पुढील वयोगटाप्रमाणे १८ वर्षावरील नागरिकांना देखील मोफत लस मिळणार आहे, असे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com