VIDEO : पंतप्रधान मोदींची सैनिकांसोबत दिवाळी

VIDEO : पंतप्रधान मोदींची सैनिकांसोबत दिवाळी

दिल्ली | Delhi

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm narendra modi) यांनी यंदाची दिवाळी (diwali) भारतीय जवानांसोबत साजरी केली.

पंतप्रधान मोदी यांनी आज नौशेरा सेक्टरमध्ये (naushera sector) जाऊन जवानांची भेट घेत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी सुमारे एक तास जवानांसोबत आपला वेळ घालवला.त्यानंतर मोदींनी जवानांना स्वत:च्या हाताने मिठाई देखील खाऊ घातली.

पंतप्रधानांनी जवानांशी संवाद साधला. या संवादावेळी त्यांनी सांगितले की, आजवर मी माझी प्रत्येक दिवाळी जवानासोबत घालवली आहे. भारतीय लष्करातील जवानांचे सुरक्षा कवच आहे. त्यामुळेच भारतातील प्रत्येक नागरिक सुखाची झोप घेऊ शकतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे बोलताना सांगितले, मी प्रत्येक दिवाळी आमच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसोबत घालवली आहे. आज, मी माझ्यासोबत येथे आमच्या सैनिकांसाठी कोट्यवधी भारतीयांचे आशीर्वाद घेऊन आलो आहे. आपले सैनिक हे 'भारतमाते'चे 'सुरक्षा कवच' आहेत. तुमच्या सर्वांमुळेच आपल्या देशातील लोक शांतपणे झोपू शकतात आणि सण-उत्सवांमध्ये आनंद असतो.

तसेच 'मी एकटा नाही आलोय. मी माझ्यासोबत १३० कोटी देशवासीयांचे आशीर्वाद तुमच्यासाठी आणले आहेत. आज संध्याकाळी भारताचा प्रत्येक नागरीक दिवाळीनिमित्ताने एक दिवा लावून तुमच्या वीरत्वासाठी, तुमच्या शौर्यासाठी, तुमच्या पराक्रमासाठी लावून तुम्हाला अनेकानेक शुभकामना देईल', असं देखील मोदी यावेळी म्हणाले.

दरम्यान जवानांसोबत दिवाळी सण साजरा करण्यासाठी पंतप्रधान मोदी काही सीमेवरील भागांची निवड करत असतात. पंतप्रधान मोदी दरवर्षी सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा करतात. यावेळी पंतप्रधान जवानांसोबत वेळ घालवतात. तसेच त्यांचं मनोधैर्य उंचावण्याचं काम करतात.

यापूर्वी २०१९ मध्ये आर्टिकल ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरमध्ये दिवाळी साजरी केली होती. यावेळी पंतप्रधान मोदींनी राजौरी जिल्ह्यात तैनात जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com