केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर ; 'या' मंत्र्यांकडे 'ही' खाती

नारायण राणेंकडे 'या' मंत्रालयाची जबाबदारी
केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर ; 'या' मंत्र्यांकडे 'ही' खाती

नवी दिल्ली / New Delhi - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. राष्ट्रपती भवनात 43 मंत्र्यांचा शपथविधी झाला. यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय तर अमित शाह यांच्याकडे गृहमंत्रालयासह सहकार मंत्रालयाचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे.

देशाच्या आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी मनसुख मांडवीय यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यासोबतच नव्याने तयार करण्यात आलेल्या केंद्रीय सहकार विभागाची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

कुणाकडे कोणते खाते

पंतप्रधान नरेंद्र मोदी - विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय (अतिरिक्त भार)

मनसुख मांडवीय - आरोग्य मंत्री, रसायन मंत्री

अमित शाह - सहकार मंत्री (अतिरिक्त भार)

ज्योतिरादित्य सिंदिया - हवाई वाहतूक मंत्री

अनुराग ठाकूर - माहिती व प्रसारण मंत्री, युथ अफेअर्स

हरदीप पुरी - नागरी विकास, गृहनिर्माण आणि पेट्रोलियम मंत्री

नारायण राणे - मध्यम व लघु उद्योग मंत्री

धर्मेंद्र प्रधान - शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री

अश्‍विनी वैष्णव - रेल्वे मंत्री आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्री

पियुष गोयल - उद्योगमंत्री

स्मृती इराणी - महिला व बाल कल्याण मंत्री

सरबानंद सोनोवाल - बंदर आणि जलवाहतूक मंत्री, आयुष मंत्रालय

पशुपतीकुमार पारस - अन्न प्रक्रिया मंत्री

गजेंद्रसिंह शेखावत - जलशक्ती मंत्री

पुरुषोत्तम रुपाला - मासेमारी, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्री

राज्यमंत्री

भगवंत खुबा - अपारंपरिक उर्जा विभाग आणि खते-रसायन विभाग राज्यमंत्री

कपिल पाटील - पंचायती राज राज्यमंत्री

प्रतिमा भौमिक - सामाजिक न्याय राज्यमंत्री

सुभास सरकार - शिक्षण राज्यमंत्री

राजकुमार रंजन सिंह - परराष्ट्र विभाग आणि शिक्षण राज्यमंत्री

भारती पवार - आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री

विश्‍वेश्‍वर टुडू - आदिवासी विकास आणि जलशक्ती विभाग राज्यमंत्री

शांतनु ठाकूर - बंदर, जलवाहतूक राज्यमंत्री

मुंजपरा महेंद्र - महिला व बालकल्याण आणि आयुष विभाग राज्यमंत्री

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com