'करोना विरुद्धच्या कडव्या लढ्यातील निर्णायक क्षण'

करोना लसींच्या मंजूरीनंतर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
'करोना विरुद्धच्या कडव्या लढ्यातील निर्णायक क्षण'

दिल्ली । Delhi

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DCGI ने दोन करोना प्रतिबंधात्मक लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत DCGI ने ही माहिती दिली. डीसीजीआयचे संचालक व्हीजी सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. DCGI ने परवानगी दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून पहिली प्रतिक्रिया केली आहे.

'भारत आत्मनिर्भर होत आहे. करोनाच्या दोन लशींना नुकतीच DCGI कडून परवानगी मिळाली आहे. आपल्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन! भारतीयांचं अभिनंदन आणि आपल्या शास्त्रज्ञांनी केलेल्या मेहनतीबद्दल अभिनंदन. या लशीमध्ये स्वदेशी लस आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हिशिल्ड लस आहे.' भारत आत्मनिर्भतेच्या दिशेनं जात असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे

तसेच, आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आलेल्या दोन लसी भारतात तयार झाल्या आहेत, याचा प्रत्येकाला अभिमान आहे. आत्मानिर्भर भारतचे स्वप्न पूर्ण करण्याचं हे एक महत्वाचं पाऊल आहे, असं मोदींनी म्हटलंय.

पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की, या करोना काळात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, शास्त्रज्ञ, पोलिस कर्मचारी, स्वच्छता कामगार आणि सर्व कोरोना योद्ध्यांच्या कृतज्ञतेसाठी मी व्यक्त करतो. या योद्ध्यांनी अनेकांचे जीव वाचविल्याबद्दल त्यांचे आभारी आहोत, असं मोदींनी म्हटलंय.

अखेर यश मिळालं; अदर पुनावाला यांनी ट्विट करून व्यक्त केला आनंद

कोविशिल्ड लसीला मंजुरी देण्यात आल्यानंतर सीरम इन्सिस्ट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला. “सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. लस संकलनासाठी सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाने पत्करलेल्या सर्व अडचणींचं अखेर यश मिळालं. करोनावरील भारताच्या पहिली लस असलेल्या कोविशिल्डला मंजुरी मिळाली आहे. ही लस सुरक्षित आणि परिणामकारक आहे आणि पुढील काही आठवड्यात लोकांना देण्यासाठी तयार आहे,” असं सांगत पुनावाला यांनी आपल्या आनंदी भावना व्यक्त केल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com