
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचे भाऊ प्रह्लाद मोदी (Prahlad Modi) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे...
प्रह्लाद मोदी यांच्यावर किडनीबाबत आजारावर उपचार सुरू आहेत. त्यांना चेन्नईच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते अहमदाबादमध्ये राहत असून तिथे त्यांचे किराणाचे दुकान आणि एक एक टायरचे शोरूम आहे.
प्रह्लाद मोदी याआधी २०१८ मध्ये चर्चेत आले होते. त्यावेळी गुजरात रास्त भाव दुकान आणि केरोसीनचा परवाना घेतलेल्या ग्राहकांमध्ये जोरदार वाद सुरू होते. याच विरोधात प्रह्लाद मोदींनी आंदोलन केले होते.
त्यावेळी ते गुजरात रास्त भाव दुकान मालकांच्या संघटनेचे अध्यक्ष होते. प्रह्लाद मोदी हे नरेंद्र मोदी यांच्याहून दोन वर्षांनी लहान आहेत. तर त्यांच्या ५ भावंडांपैकी चौथ्या क्रमांकावर आहेत.