पंतप्रधानांकडून विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ; कौशल्य प्रशिक्षणासोबत मिळेल इतक्या लाखांचे कर्ज

पंतप्रधानांकडून विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ; कौशल्य प्रशिक्षणासोबत मिळेल इतक्या लाखांचे कर्ज

नवी दिल्ली | New Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल ७३ वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. मोदी हे स्वतंत्र भारतात जन्मलेले देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने आज देशाला अनोखी भेट दिली आहे. पंतप्रधान मोदींनी आज दिल्लीत यशोभूमी नावाच्या इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटरचे उद्घाटन केले. यासोबतच त्यांनी विश्वकर्मा योजनेलाही (Vishwakarama Yojana) सुरुवात केली.

कोणतीही हमी न मागता ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. नवीन टूल्स खरेदी केल्यावर, तुम्हाला प्रथमच १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल. त्याची परतफेड केल्यानंतर दोन लाखांचे कर्ज दिले जाणार आहे. अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजनेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.

पंतप्रधानांकडून विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ; कौशल्य प्रशिक्षणासोबत मिळेल इतक्या लाखांचे कर्ज
जम्मु-काश्मीर चकमकीवरुन केंद्रीय मंत्र्यांचा पाकिस्तानला सज्जड दम; म्हणाले, भारताच्या नादी...

पुढे ते म्हणाले की, भारताची स्थानिक उत्पादने जागतिक बनवण्यात विश्वकर्मा योजना महत्त्वाची भूमिका बजावेल. ज्याप्रमाणे शरीरात पाठीचा कणा असतो, त्याचप्रमाणे समाजजीवनात विश्वकर्मा सोबती महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्याशिवाय दैनंदिन जीवनाची कल्पना करणे कठीण आहे. फ्रीझच्या काळातही लोकांना मातीच्या भांड्यातीलच पाणी आवडते. तेव्हा अशा कारागिरांना ओळख आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठीच ही योजना आणली असल्याचेही मतही पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यक्त केले.

विश्वकर्मा योजनेंतर्गत सरकार १३,००० कोटी रुपये खर्च करणार आहे, ज्याद्वारे पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना मदत मिळेल. सरकारने या योजनेत १८ पारंपारिक कौशल्य व्यवसायांचा समावेश केला आहे, ज्यामुळे संपूर्ण भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील कारागीरांना मदत होईल. यामध्ये सुतार, होडी बनवणारे कामगार, लोहार, कुलूप बनवणारे कारागीर, सोनार, मातीची भांडी आणि इतर वस्तू बनवणारे कुंभार, शिल्पकार, गवंडी, माशांचे जाळे बनवणारे, खेळणी बनवणारे आणि इतरांचा समावेश आहेत.

देशातील नागरिकांचे कौशल्य वाढवण्यासाठी या माध्यमातून प्रशिक्षणही दिले जाणार आहे. योजनेचे लाभार्थी पीएम विश्वकर्मा पोर्टलशी जोडले जातील. कारागीर आणि कारागिरांची मोफत नोंदणी करण्यात येणार आहे. अर्ज करणाऱ्या नागरिकांचे वय त्यासाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे इतके असणार आहे. विश्वकर्मा योजनेचा देशातील ३० लाख कुटुंबांना थेट फायदा होणार आहे. या योजनेचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लाभ करोडो लोकांना होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com