पंतप्रधान मोदी साधणार 54 जिल्हाधिकार्‍यांशी संवाद

20 मे ला बैठक
पंतप्रधान मोदी साधणार 54 जिल्हाधिकार्‍यांशी संवाद

नवी दिल्ली -

देशात करोनाच्या दुसर्‍या लाटेने थैमान घातले आहे. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रासह दहा राज्यांतील 54 जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करणार आहे. येत्या 20 मे ला सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहेत.

यावेळी ते महाराष्ट्रासह 10 राज्यातील करोना स्थितीचा आढावा घेतील तसेच ते वाढता करोना आटोक्यात आणण्यासाठी काय प्रयत्न करावेत, करोना प्रतिबंधक लसीकरण कसे वाढवू शकतो? यासह विविध विषयांवर मार्गदर्शन करतील.

दरम्यान, या बैठकीला महाराष्ट्रासह इतर कोणकोणत्या दहा राज्यातील जिल्हाधिकारी सहभागी होतील, याबाबतची माहिती समजू शकली नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com