पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेले योगा ॲप आहे तरी कसे?

पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेले योगा ॲप आहे तरी कसे?

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

भारतातील पुरातन आणि आध्यात्मिक साधना अशी ओळख असणाऱ्या योगाभ्यासाद्वारे, शारीरिक व मानसिक आरोग्य निरोगी राखणे सहज शक्य आहे. हेच महत्व ओळखून संयुक्त राष्ट्राच्या पुढाकारातून, जगभरात २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दिवसाचे निमित्त साधून 'M-Yoga' हे ॲप लवकरच सर्वांसाठी उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर केले आहे.

या ॲपमध्ये योग प्रशिक्षण देणारे अनेक व्हिडिओ विविध भाषांमध्ये असणार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकारने हे ॲप तयार करण्यात आले आहे.

हे ॲप पूर्णतः सुरक्षित आहे. यूझरच्या मोबाईलमधून कुठल्याही प्रकारची माहिती गोळा करण्याचे काम ते करत नाही. योगाचा जगभर प्रसार व्हावा म्हणून या ॲपमध्ये योगासने कशी करावीत याची माहिती दिली जाईल. या ॲपमध्ये योगासंबंधी व्हिडिओ प्रसिद्ध केले जातील.

पंतप्रधान मोदी या ॲपबद्दल म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्राचीन विज्ञान यांच्या संगमाचे उत्तम उदाहरण म्हणजे हे ॲप आहे. आता जगाला M-Yoga या ॲपची शक्ती मिळणार आहे.

कोरोना काळात संपूर्ण जग योग विज्ञानाकडे आशेचा किरण म्हणून पाहत आहे. आपण तणावात असताना आपल्याला शक्तीचा मार्ग योग दाखवतो. जनतेच्या आरोग्याची देखभाल करण्यासाठी निवारक म्हणून महत्त्वाची भूमिका योग निभावत राहिल, असा माझा विश्वास असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com