मोदींच्या हस्ते 'आयुष्मान भारत डिजिटल मिशन' सुरु; काय आहे योजना?, काय होणार फायदे?, वाचा

मोदींच्या हस्ते 'आयुष्मान भारत डिजिटल मिशन' सुरु; काय आहे योजना?, काय होणार फायदे?, वाचा

दिल्ली | Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज भारतामध्ये आयुषमान भारत डिजिटल मिशनचा (Ayushman Bharat Digital Mission) शुभारंभ केला आहे. राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाच्या प्रायोगिक प्रकल्पाची घोषणा पंतप्रधानांनी १५ ऑगस्ट, २०२० रोजी लाल किल्ल्याच्या (Lal Killa) तटबंदीवरून केली होती.

दरम्यान यावेळी पंतप्रधानांनी (PM Modi) जनतेला संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी आरोग्यसेतू (aarogya setu), कोविन (CoWIN) सारख्या डिजीटल सुविधांच्या करोनाकाळातल्या (COVID19) कामगिरीचं कौतुक केलं आहे. तर करोना काळात टेलिमेडिसीनच्याही (Telemedicine) वापरात वाढ झाली असून ई-संजीवनी (eSanjeevani OPD service) सुविधेचा लाभही अनेकांना झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

तसंच देशातल्या डॉक्टर (Doctor), नर्सेससह (Nurses) सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे (medical staff) आभार मानले. तसेच, आयुष्मान भारत डिजीटल मिशन (Ayushman Bharat Digital Mission) आता देशवासियांना आता डिजीटल हेल्थ आयडी (Digital Health ID) मिळेल. प्रत्येक नागरिकाचं हेल्थ रेकॉर्ड डिजीटली (Digital Health records ) सुरक्षित राहील. यामुळे रुग्ण आणि डॉक्टर दोघेही रुग्णाच्या आरोग्यस्थितीबद्दलची माहिती घेऊ शकतील. डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची (paramedical staff) नोंदणीही या प्रणाली द्वारे केली जाणार आहे. तसंच दवाखाने (Hospital), औषधाची दुकाने (Drug stores), लॅबोरेटरी (Laboratory), प्रत्येक गोष्ट या प्रणालीच्या माध्यमातून नोंदणीकृत होणार आहे आणि एकाच छताखाली देशवासियांना आरोग्यविषयक सर्व सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे देशाच्या कोणत्याही भागात रुग्णांना डॉक्टर शोधत बसण्याची गरज भासणार नाही. फक्त डॉक्टरच नव्हे तर मेडिकल आणि चाचण्यांसाठीच्या लॅब्सही या प्रणालीच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.

काय आहे योजना?

या योजनेनुसार देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र युनिट हेल्थ ओळखपत्र (Health Identity Card )जारी केलं जाणार आहे. त्या ओळखपत्रात व्यक्तीच्या आरोग्याची पूर्ण माहिती देण्यात येईल. प्रत्येक व्यक्तीचं आधार कार्ड (Aadhaar card) आणि मोबाईल नंबर (Mobile Number) यांचा वापर करून आरोग्याची माहिती प्रोसेस केली जाईल. त्यामुळे प्रत्येकाच्या कार्डवर त्याच्या आरोग्याबाबतचे अपडेट्स (Health updates), त्याची मेडिकल हिस्ट्री (Medical history) आणि आरोग्याबाबतचे इतर तपशील समजू शकणार आहेत. एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन झालं आहे का, ते कुठं झालं होतं, त्याला कुठले आजार आहेत, वगैरे माहिती त्या कार्डवर नोंदवण्यात येईल.

काही राज्यांत अगोदरपासून योजना ही योजना देशातील काही केंद्रशासित प्रदेशांत अगोदरपासूनच सुरु आहे. अंदमान आणि निकोबार (Andaman and Nicobar), दादरा आणि नगर हवेली (Dadra and Nagar Haveli), लडाख (Ladakh), लक्षद्वीप आणि पुदुच्चेरी (Lakshadweep and Puducherry) या ठिकाणी ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचे मुख्यत्वे तीन भाग करण्यात आले आहेत. नागरिकांचे कामकाजाबाबतचे तपशील, आरोग्याचे तपशील आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड यांचा यात समावेश असणार आहे.

काय होणार फायदे?

भविष्यातील आव्हानं लक्षात घेऊन ही योजना तयार करण्यात आली आहे. यामुळे केवळ रुग्णांना नव्हे, तर डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनाही फायदा होणार आहे. सर्व माहिती डिजिटल स्वरुपात उपलब्ध असल्यामुळे कागदोपत्री आरोग्याचे रेकॉर्ड ठेवण्याचीही गरज संपणार आहे. रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांना त्यांची पूर्ण मेडिकल हिस्ट्री (Medical history) पाहता येणार आहे.

Related Stories

No stories found.