Sputnik V लसीची दुसरी खेप भारतात दाखल; Sputnik V Lite लवकरच दाखल होणार?

Sputnik V लसीची दुसरी खेप भारतात दाखल; Sputnik V Lite लवकरच दाखल होणार?

दिल्ली | Delhi

देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केला आहे. दररोज मोठ्या संख्येनं रुग्ण रुग्णालयांमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे एकूणच आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे.

करोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी देशात लसीकरण मोहिमही जोरात सुरु आहे. या टप्प्यात आता भारतीयांना स्पुटनिक लसही उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, रशियाच्या 'स्पुटनिक-व्ही' (Sputnik V) करोना प्रतिबंधक लसीची दुसरी खेप शनिवारी भारतात दाखल झाली. १ मे रोजी Sputnik V लसीची पहिली खेप भारतात दाखल झाली होती. पुढील आठवड्यात नागरिकांसाठी ही लस उपलब्ध होणार आहे. स्पुटनिक व्ही ही भारतातील तिसरी लस असेल. सध्या भारतात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा वापर जानेवारीपासून केला जात आहे.

दरम्यान, भारतात रशियाच्या स्पुटनिक व्ही लाईट (Sputnik V Lite) लस येण्याची आशा देखील जागृत झाली आहे. यासंदर्भात बोलताना रशियाच्या राजदूतांनी सांगितले, Sputnik V ही रशियन-इंडियन लस आहे. भारतात याचे उत्पादन वाढून वर्षाला ८५० मिलियन पर्यंत पोहचेल, अशी आम्हाला आशा आहे. त्याचबरोबर लवकरच भारतात Sputnik V Lite सिंगल डोस लस सादर करण्याची योजना असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Sputnik V Lite ही लस ह्यूमन एडिनोवायरल प्लेटफॉर्म आधारित आहे. ही अत्यंत सुरक्षित आणि प्रभावशाली आहे. २१ फेब्रुवारीला गामलेया सेंटर आणि आरडीआयएफने जगभरात स्पुटनिक लाईट लसीच्या परिणामांच्या अभ्यासाला सुरुवात केली आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्स अनेक देशांमधील तब्बल ७ हजार नागरिकांवर करण्यात आला. यात रशिया, संयुक्त अरब अमीरात (युएई) आणि घाना यांचा समावेश आहे.

Sputnik V Lite लस दिल्यानंतर २८ दिवसांनी घेण्यात आलेल्या माहितीनुसार, सिंगल डोस लस स्पुटनिक लाईट ७९.४ टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले. दोन डोस लसींच्या तुलनेत स्पुटनिक लाईट लसीचा प्रभाव हा सुमारे ८० टक्क्यांहून अधिक आहे. दरम्यान, या लसीला रशियात वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com