आसाममध्ये पुराचा हाहाकार! लष्कराकडून बचावकार्य सुरु, पाहा PHOTO

आसाममध्ये पुराचा हाहाकार! लष्कराकडून बचावकार्य सुरु, पाहा PHOTO

देशात एकीकडे उन्हाचा पारा वाढत असताना आसाममध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजविला आहे.

पुरामुळे आसाममधील जनजीवन विस्कळीत झालं असून परिस्थिती गंभीर झाली आहे.

या महापुराचा जवळपास ७ लाख लोकांना तडाखा बसला आहे.

९३ हजार ५६२.४० हेक्टर पीक जमीन आणि २ हजार २४३ गावे अजूनही पाण्याखाली आहेत

आसाममधील मोरीगाव आणि करीमगंज या जिल्ह्यातील परिस्थिती आणखी गंभीर आहे.

आसामसह बिहारमध्येही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. बिहारमध्येही पूरस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती मिळाली आहे.

आसाममध्ये पूरस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणी नौदल आणि बचाव पथकाकडून नागरिकांचे स्थलांतरण करण्यात येत आहे.

पूरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात येत आहे.

आसाममध्ये लोकांच्या मदतीसाठी २१४ मदत केंद्र उभारण्यात आले आहेत.

पुढील २४ ते ४८ तास देशाच्या उत्तर पूर्व भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com