Petrol-Disel Price : डिझेलच्या दरात काहीशी घट पण पेट्रोलचा भडका कायम, जाणून घ्या आजचे दर

Petrol-Disel Price : डिझेलच्या दरात काहीशी घट पण पेट्रोलचा भडका कायम, जाणून घ्या आजचे दर

दिल्ली | Delhi

देशात एकीकडे करोनाचा (Corona) प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक जण बेरोजगार झाले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसात देशात इंधनाची दरवाढ (Fuel Price Hike) होत आहे. अनेक राज्यांमध्ये पेट्रोलनं इतिहासात पहिल्यांदाच शंभरीपार मजल मारली आहे.

देशभरात एका दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे दरात कोणताही बदल झाला नाही. तर शनिवारी (१० जुलै) पेट्रोलच्या दरात ३५ पैसे आणि डिझेलच्या दरात २६ पैशांची वाढ करण्यात आली होती. आज पेट्रोलच्या दरात २७ पैशांची वाढ झाली आहे. मात्र, डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. डिझेल १६ पैशांनी स्वस्त झाले आहे.

राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे १०१.१९रुपये आणि ८९.७२ रुपये मोजावे लागतील. मुंबईत आजचा पेट्रोलचा प्रति लिटर दर १०७.२० रुपये तर डिझेलसाठी ९७.२९ रुपये मोजावे लागत आहे. भोपाळमध्ये पेट्रोल १०९.५३ रुपये तर डिझेल ९८.६७ रुपये आहे. तर कोलकातामध्ये लोकांना पेट्रोलसाठी १०१.०१ रुपये आणि डिझेलसाठी ९८.५० रुपये मोजावे लागतील. दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, जम्मू-कश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब, लद्दाख आणि सिक्किममध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com